महापुरुषांची बदनामी करण्याच्या षडयंत्राविरोधात पुरोगामी संघटनांचा एल्गार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज व इतर थोर पुरुषांची बदनामी करण्याच्या षडयंत्रा विरोधात दि. १३  डिसेंबर रोजी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन पुरोगामी संस्था संघटनांच्या महत्वपूर्ण बैठकीत निर्धार करण्यात आला आहे.

 

देशात सर्वत्र विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांना निशाणा करत त्यांच्या बदनामीचे षडयंत्र करीत आहेत. याच्या विरोधात जळगाव शहरातील सर्व पुरोगामी संस्था संघटना कार्यकर्ते यांनी एकत्र येत एक कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी व त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सर्वांची  नुकतीच अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये बैठक पार पडली.या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा प्रीमियल लिंक, जनक्रांती मोर्चा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, बुलंद छावा, मराठा क्रांती मोर्चा, शिवसेना [उध्व बाळासाहेब ठाकरे ], समाजवादी पार्टी, भारतीय काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोलाना आझाद विचार मंच, व लोकसंघर्ष मोर्चा तसेच सर्व शिवप्रेमी या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यपाल कोशारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड केंद्रीय मंत्री दानवे यांचा त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करीत या सर्वांनी महाराष्ट्राची माफी मागत राजीनामे द्यावेत अशी मागणीही एकमताने करण्यात आली व त्याचा इशारा देण्यासाठी दि १३ डिसेंबर रोजी जळगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत सुरेंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, करीम सालार, राम पवार, कुलभूषण पाटील, रमेश पाटील, तुषार सावंत, संदीप पाटील, सुमित्र अहिरे, विजय पाटील, सुनील गरुड, नाना महाले विजय देसाई, भूषण पवार, दीपक सपकाळे वाल्मिक सपकाळे, प्रमोद पाटील, फारूक कादरी, रइस बागवान, फइम पटेल, विजय सुरवाडे सोमनाथ पाटील, सचिन धांडे, संजय महाजन, अनवर खाटिक, कैलास मोरे, अविनाश तायडे, पार्टिक झनके, शकील शेख, अमजद रंगरेज, महेंद्र केदार, योगेश कदम,आकाश सणस,मोसिन शेख शाम सूर्यवंशी, अखिल खान करीम, तुषार सावंत, शांताराम बुधा पाटील, संदीप पाटील, विकास पवार, अशोक पवार. भारत कर्डिले, सागर पाटील आदींनी आपली मते मांडलीत. दि १३ डिसेंबर रोजीच्या रास्तारोको आंदोलनासंदर्भात दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सरदार वल्लभ पटेल लेवा भवन, जळगाव येथे आढावा बैठक ठेवण्यात आली आहे.  ह्यात सर्वानी उपस्थित राहावे ही विनंती सर्व शिवप्रेमी लोकांनी केली आहे.

 

Protected Content