राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकारी परीक्षेत डॉ. कांचन विसपूते उत्तीर्ण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सदस्या डॉ. कांचन विसपूते ह्या जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकारी पंच परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १२ जुलै रोजी महिलांसाठी जिल्हा तांत्रिक अधिकखरी परिक्षेचे ऑनलाईन लेखी परीक्षा व १९ जुलै रोजी ऑनलाईन तोंडी परिक्षा घेण्यात आले. या परिक्षेत राज्यातील १६ महिलांचा उत्तीर्ण झाल्या आहेत. यात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सदस्या डॉ. कांचन अमोल विसपूते या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच FSTO परिक्षेस पात्र ठरल्या आहेत. डॉ. कांचन विसपूते ह्या वाघ नगरातील विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून आहेत. जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळील असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, कोषाध्यक्ष पी.आर.चौधरी, समीर घोडेस्वार, निलेश पाटील, संजय महाजन, मनोज वाघ, सुनिल साळवे आदी उपस्थित आहे.

Protected Content