सचिन पायलट यांनी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती ; कॉंग्रेस आमदाराच्या दाव्यानंतर खळबळ

जयपूर (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी केला आहे. गिरीराज सिंह यांच्या गौप्यस्फोटानंतर राजस्थानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह पुढे म्हणाले, माझी चर्चा सचिन पायलट यांच्याशी झाली होती. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले होते जितके हवे तितके पैसे घ्या. अगदी ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ते उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांची माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर गिरीराज सिंह म्हणाले मी रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. ना मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपावाल्यांनी माझ्यासोबत कधीही चर्चा केली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावने हे चुकीचे असल्याचे देखील गिरीराज सिंह म्हणाले.

Protected Content