तर महापालिका मेहरूण तलावात नेऊन बुडवा : शिवसेना गट नेते अनंत जोशी यांचा सल्ला (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजाराकड़े मनपा प्रशासनाने कोरोनाच्या नावाखाली कानाडोळा केला असून कचरा स्पॉट दुर्लक्षित असल्याचा आरोप करत मनपा अधिकाऱ्यांना दैनंदिन नियोजन करता येत नसेल तर महापालिका मेहरूण तलावात बुडवा असा सल्ला शिवसेना मनपा गट नेते अनंत जोशी यांनी दिला आहे.

प्रभाग क्र. १२मध्ये मनपातर्फे गटारी महिन्यातून एखाद वेळेस काढले जात असल्याचा आरोप अनंत जोशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केला आहे. गटारीत काढ़लेली घाण १५/१५ दिवस उचलत नाहीत. झाड़ू कामगार ८/१५ दिवसात एखाद वेळेस झडताना दिसतात. प्रभागात कामाकरीता जेसीबी महीनोंन महीने मागून मग दिले जाते. एमएससीबीने पावसाळ्यात छाटलेल्या फांदया कित्येक दिवस रस्त्यांवर अस्तावेस्त पडलेले होते. रस्त्यावरच्या डेब्रिज तसेच पावसाने झालेली घाण उचलायला टॅक्टर मिळत नाही. अमृतच्या चाऱ्यांचे डांबरिकरण होत नाही. .बांधकाम विभागाकड़े अनेक महिने टॅक्टर नाही.स्ट्रीट लाइट बन्द असतात. अनेक ठिकाणी पाणी गळती असते पण कर्मचारी नाहीत. याबाबत श्री. जोशी यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते कोरोनाच्या ड्युटीवर असल्याचे उत्तर देतात. कोविड सेंटरवर काम सुरु आहे. माणस तिकडे आहेत वाहन तिकडे आहेत. कोरोना कोरोना आणि फ़क्त कोरोनो. माझ्या प्रभागाची घाण करून ठेवली आहे बस करा आता चार महीने झालेत. दैनदिन सुविधा आणि कोविडचे नियोजन दोन्ही वेगळे विषय आहेत. नियोजन तुम्ही केले पाहिजे तुमची जवाबदारी आहे आणि नसेल जमत तर मेहरूण तलावात नेऊन बुडवा ती महापालिका असा संतप्त होऊन श्री. जोशी यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/608470686452236/

 

Protected Content