चोपडा, प्रतिनिधी । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवास्थानात जतन करून ठेवलेल्या पुस्तकामुळे ते अनुयाईचे आदररूपी ज्ञान भांडार असलेले राजगृहावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.त्यात तावदानाच्या काचा, सीसीटीव्ही कॅमेरे, झाडांच्या कुंड्या फोडून राजगृह परिसराची बरीच नासधूस केलेली आहे. याचा भाजपातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन तात्काळ दोषींना शोधून काढून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार अनिल गावित यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींना शोधून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष पंकज भाऊ पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. निवेदनावर भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधान सभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन तथा माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील ,उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, प्रवीण चौधरी, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील भरतसोनगिरे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश लक्ष्मण पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना सर्व उपस्थित होते.