रशियाच्या लशीची अंतिम  चाचणी भारतातही होणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रशियाने विकसित केलेली कोरोनावरची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस भारतात दाखल होणार आहे. याच महिन्यात ही लस भारतात येणार आहे. या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी भारतातही होणार आहे. रशियाने संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे.

लस उत्पादन करण्यासाठी निधी जमवणारी संस्था रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडचे सीईओचे किरील दिमित्री यांनी सांगितले की, या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह युएई, सौदी अरेबिया, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. ती मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे.

Protected Content