जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी म्हणून सनदी लेखापाल रवींद्र पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला. उप वित्त अधिकारी असलेले श्री. गोहिल हे गेल्या १० महिन्यांपासून प्रभारी वित्त व लेखा अधिकारी म्हणून काम पाहत होते. पदभार घेतांना कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार, उपकुलसचिव अनिल मनोरे आणि वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रवींद्र पाटील यांची गेल्या आठवडयात मुलाखतीव्दारे वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असेलेल्या श्री. पाटील यांना सनदी लेखापाल म्हणून १० वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठाचे ते तिसरे वित्त व लेखा अधिकारी आहेत.