विद्यापीठाच्या चौथ्या नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चौथ्या नामविस्तार दिनानिमित्त गुरुवार, दि.११ ऑगस्ट रोजी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.आर.एस.माळी उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी राहतील.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.विजय खोले व मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.आर.डी.कुलकर्णी उपस्थित राहतील. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे देखील यावेळी हजर राहणार असून या समारंभात विद्यापीठाच्या नूतन संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे.

विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळाचे नूतनीकरण करण्यात आले असून दिव्यांग तसेच विद्यार्थी, कर्मचारी आणि भागधारक यांना हे संकेतस्थळ मोबाईल, डेस्कटॉप, अथवा टॅब या व्दारे देखील सहजपणे हाताळता येणार आहे. हे संकेतस्थळ संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस. आर. कोल्हे, प्रा.मनोज पाटील, पध्दती विश्लेषक दाऊदी हुसेन यांनी विकसित केले आहे.

Protected Content