कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्यांना जन्म !

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात उपचार सुरू असणार्‍या महिलेने दोन जुळ्यांना जन्म दिला असून नवजात शिशूंचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिला गेल्या १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होती. तिचा अहवाल ९ मे रोजी पॉझिटिव्ह असल्याने तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. डॉ. नरेंद्र पाटील यांनी सिझेरीयन करून या महिलेची प्रसूती केली. त्यांना डॉ. आकाश टोकरे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ. काजल साळुंखे, डॉ. जितेंद्र भोळे, परिचारिका निंबाळकर यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही नवजात शिशूंना कोरोनाने ग्रासले आहे की नाही ? या साठी दोघांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Protected Content