जिल्ह्यात नविन ८१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगाव, बोदवड, जामनेरात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या स्वॅब तपासणीचा अहवाल आरोग्य विभागाला आज प्राप्त झाला असून जिल्हात नव्याने ८१ रूग्ण कोरोना पाझिटीव्ह आढळून आले आहे. यात जळगाव, बोदवड तर जामनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. आता जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या २४८३ झाली आहे.

आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज एकुण ८१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील आढळून आलेले रूग्ण याप्रमाणे – जळगाव २०, ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोदवड २० प्रमाणे आहेत.

तालुकानिहाय रूग्ण संख्या
जळगाव (शहर ४६४ + ग्रामीण ७६) एकुण ५४०, भुसावळ ३६६, अमळनेर २६४, चोपडा १९४, पाचोरा ५४, भडगाव ११३, धरणगाव ११२, यावल ११३, एरंडोल ७७, जामनेर १२३, रावेर १८२, पारोळा १६७, चाळीसगाव २६, मुक्ताईनगर १७, बोदवड ३६, अन्य जिल्हा ९, जिल्ह्याव्यतिरिक्त इतरत्र ९० एकुण २४८३ झाली आहे.

Protected Content