माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील  हे आज दुपारी तातडीने मुंबईकडे निघाले असून त्यांचा उद्याच्या शपथविधीत समावेश निश्‍चीत मानला जात आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या विस्ताराला उद्याचा मुहूर्त लाभला आहे. क्रांती दिनी राज्यात मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. राजभवनात यासाठी तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, या विस्तारात शिंदे गट आणि भाजप यांचे मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात जिल्ह्यातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन आणि माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांचा समावेश निश्‍चीत मानला जात आहे.

 

यातील आ. गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. तर, आ. गुलाबराव पाटील हे दोन दिवसांपासून जिल्ह्यात होते. त्यांनी काल आणि आज विविध कार्यक्रमांना उपस्थिती देखील लावली. यानंतर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते रेल्वेद्वारे मुंबई येथे रवाना झाले. उद्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात आ. गुलाबराव पाटील यांचा समावेश असेल हे निश्‍चीत मानले जात असल्याने त्यांनी तातडीने मुंबईकडे प्रयाण केल्याचे मानले जात आहे.

Protected Content