यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावलच्या वतीने भगवान विश्वकर्मा यांच्या जयतीचे औचित्य साधुन अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात संस्थेत आर. ए. सी, वायरमन, कोपा, मेकॅनिक ट्रॅक्टर, ड्रेस मेकिंग असे पाच ट्रेड प्रशिक्षणा करिता उपलब्ध आहे.
संस्थाच्या वतीने नुकत्याच घोषित झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२ निकालामध्ये संस्थेचा ९२ % टक्के इतका निकाल लागलेला आहे.आय टी आय मध्ये कौशल्य,प्रशिक्षण मिळविण्यासाठी प्रेस्टिज आणि प्राइड जोडण्याचीही गरज आहे, त्या अनुषंगाने या वर्षी पासून दरवर्षी विश्व कर्मण दिनाला दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे.
संस्थेने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमास मनीष चौधरी प्रो. सुमंच पेपर प्रा. लि., शशिकांत देशमुख प्रो. सद्गुरू ऑटो, आणि योगेश चोपडे प्रो. यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांपैकी कोपा ट्रेड मधून दिप्ती चोपडे( ८३.१७%),मेकॅनिक ट्रॅक्टर ट्रेड मधून ऋषिकेश धोंडकर ( ८०.३३%), वायरमन ट्रेड मधून आकाश भोरकडे( ८०,०८.%), ड्रेस मेकिंग ट्रेड मधून नीलिमा तडवी ( ७९.०५%) आणि आर ए सी ट्रेड मधून प्रसाद बेंडाळे( ७५%) या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी प्राशिक्षणार्थ्यांना करियर, रोजगार व स्वयंरोजगार आदी विषयांवर प्रेरणादायी असे बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले.
या विद्यार्थ्यांच्या दिक्षांत संमारंभाचा कार्यक्रम यशस्वी रित्पा पार पडण्या करिता श्रीमती एस जी देवरे, व्ही पी चौधरी, सौ. एस एन फेगडे, ए वाय भाबड, व्ही व्ही महाजन, पी व्ही न्याहळदे, बी आर पाटील, पी एम तांबट, जे जी वाघूळदे, एन टी दालवाले, डी एल तडवी, कु. आर व्ही पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.