यावल येथे मनसेचे संभाजी नगर नामकरणासाठी आंदोलन (व्हिडिओ)

यावल, प्रतिनिधी । येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावल ते औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बसवर यावल ते छत्रपती संभाजी नगर असे फलक लावून औरंगाबाद शहराचे संभाजी नगर नामकरणासाठी आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद शहराचे संभाजी नगर असे नामकरण व्हावे या मागणीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज यावल येथे बसस्थानकावर आंदोलन करून यावल ते औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बसवर यावल ते छत्रपती संभाजी नगरचे फलक लावण्यात आले. दरम्यान आज दुपारी १२ वाजता यावलच्या बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात औरंगाबाद या शहराचे संभाजी नगर असे नामकरण करण्यात यावे अशी राज्यातील मराठमोळ्यांची मनस्वी ईच्छा असुन या मागणी करिता राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर जनहीत विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी नगर नामकरणासाठी आंदोलन करून यावल ते औरंगाबाद या एसटी बसवर यावल ते छत्रपती संभाजी नगर असे फलक लावण्यात आले. या आंदोलनात विभाग अध्यक्ष आबीद कच्छी , शहरप्रमुख किशोर नन्नवरे, मनोज बारी, गोलु बारी, खुशाल सोनवणे, अशिकेश सोनवणे , शाम पवार, भिकन महाजन यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/827608387797179

Protected Content