पैश्याचे व्याज थकल्याने तरूणाला शिवीगाळ करून धमकी; चार जणांवर गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । व्याजाचे पैसे थकल्याने तरूणाला शिवीगाळ करून बंद घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले ३० हजार रूपयांची चोरी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील पंधरा बंगला भागातील रेल्वे कर्मचारी राहूल अहिरे यांनी दीड वर्षांपुर्वी गावातील किशोर सुर्यवंशी यांच्या कडून ४० हजार रूपये व्याजाने घेतले होते. १५ महिन्यांत आतापर्यंत ६ हजार रूपये महिन्याच्या व्याजाप्रमाणे ९० हजार रूपये दिले आहे. नोव्हेंबर २०२० पासून व्याजाची रक्कम थकल्यामुळे किशोर सुर्यवंशी यांनी राहुल अहिरे याला फोनवरून धमकी दिली. तसचे ११ जानेवारी रोजी २०२१ रोजी घराला कुलूप असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास बंद घरफोडून घरातील कपाटातून ३० हजार रूपयांची रोकड घेवून गेले. तसेच अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी किशोर सुर्यवंशी, इम्रान शेख व दोन अनोळखी व्यक्ती सर्व रा. भुसावळ यांच्या विरूध्द भुसावळ बाजर पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि कृष्णा भोये करीत आहे.

Protected Content