फरार असलेल्या चोरट्याला अटक: एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील बगिच्याजवळ गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला होता. याठिकाणाहून आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता. तर त्याचा साथीदार विशाल राजु अहीरे हा फरार झाला होता. तो रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील बगिच्याजवळ ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दबा धरुन बसलेले विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे, दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) बसले होते. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला. याठिकाणाहून आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्टयासह मिळुन आला होता. तर त्याचे साथीदार पळुन गेले होते. यावेळी विशाल राजु अहीरे हा सुध्दा गुन्हा घडला दिवसापासुन फरार होता. तो रेल्वेने जळगावात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पाच महिन्यांपासून फरार असलेला राजू अहिरे हा रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच शनिवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, पोकॉ साईनाथ मुंडे यांनी राजू अहिरेला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Protected Content