रस्ता डांबरीकरणाच्या कामास शुभारंभ; आ.लता सोनवणे यांच्याहस्ते भूमीपूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिन वर्षाच्या मोठया प्रतिक्षेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि वाहन धारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामास आ. लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून कामास भुमिपुजनाने प्रारंभ करण्यात आले.

यावल तालुक्यातील व चोपडा मतदारसंघात असलेले चुंचाळे आणी बोराळे गावा आ.लता सोनवणे यांच्या प्रयत्नातुन बोराळे गावात ५ लक्ष रूपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक काम व मागील ३ वर्षापासुन वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरलेले व दुरूस्तीच्या बहुप्रतिक्षेत असलेले चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५७ लाख व बोराळे गावासह चुंचाळे येथे दहा लाख रुपये निधीचे पेव्हर ब्लॉक आणि  जि.प.च्या ताब्यात असलेला चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव रस्ता डांबरीकरण ५७ लाख रुपये निधीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आ.  लता सोनवणे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास मोठया संख्येत गावातील ग्रामस्थ आणी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी  भरत चौधरी, सूर्यभान पाटील,विठ्ठल राजपूत, विकी वानखेडे,नथू धनगर, बबलू धनगर ,रहमान तडवी, लोटू धनगर, मनोज धनगर,दीपक कोळी, सुधाकर कोळी, मुबारक तडवी, प्रदीप वानखेडे, सुपडू संन्यांशी, पुनम राजपूत,कुरबान तडवी,अनिल कोळी  संजय राजपूत,संजू चौधरी,मुळा तडवी,कलिंदर तडवी,ऋषी राजपूत, संदीप वानखेडे,प्रेम मराठे,गोकुळ कोळी,निलेश राजपूत,सुमित राजपूत, गणेश राजपूत,अमर वानखेडे सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Protected Content