यावल येथे पोलीस कर्मचाऱ्यांना कोवीडचे लसीकरण

यावल प्रतिनिधी । राज्यशासनाकडून पाठविलेल्या कोवीड लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील विविध शासकीय पातळीवर नुकतेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोवीशिल्ड लस देण्यास सुरूवात झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याशासनाने कोरोनाच्या उच्चाटनासाठी लसीकरण हे प्रभावी उपचार सुरू केले आहे. याच मोहीमेंतर्गत यावल तालुक्यातील विविध शासकीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी यांना लसीकरण लावण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात प्रतिदिन १२५ जणांना ही लस देण्यात येते. आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, महसुल कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना लस देण्यात आल्याची माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी पत्रकारांना दिली.

लसीकरणाच्या या आरोग्य  विभागाच्या पातळीवरील मोहीमेस  सर्व पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान सोशल मिडीयावर कोरोनासंदर्भात विविध अर्धवट माहीती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहे, असा प्रकारे चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांवर कायद्याशीर कारवाईचे निर्देश देण्यात आली आहेत. भारतीय कोवीड१९ची लस ही पुर्णपणे सुरक्षीत असुन, आपले लसीकरण झाल्यावर देखील आपणास आधी प्रमाणेच नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे आरोग्य सुत्रांनी दिलेल्या माहिती व्दारे सांगीतले आहे.

Protected Content