मनवेल येथे आशा वर्कर्सचा ‘एक मुल एक वृक्ष’ उपक्रम

manvel aasha workers project

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील आशा स्वयंसेविकांतर्फे शासनाचा ‘एक मुल एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा वर्कर यांच्या मार्फत ‘एक जन्म, एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाची निगा राखण्यासाठी बाळाचा जन्म होताच त्या घरात एक वृक्ष लागवड केली जात आहे. ग्लोबल वार्मिंग ही जागतिक समस्या असून यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे.ही गंभीर बाब लक्षात ही योजना राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत प्रत्येक कुंटूबात नवजात बाळा पासून पाच ते सहा वर्षा पर्यंतच्या बालकाच्या नावाने वृक्ष लावून त्याला बाळाचे नाव देवून त्याची बाळा प्रमाणेच जोपासना करुन त्याच्या संगोपनाची जबाबदारी आशा वर्कर व आशा गटप्रवर्तक यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत मनवेल या गावात राहणार्‍या विजय बाबुसिंग पाटील यांच्या मुलाच्या जन्मानंतर निंबाचे एक झाड मनवेल येथील बसस्थानकाच्या समोर लावण्यात आले

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक चित्रा फेगडे यांनी या उपक्रमाची यशस्वी रित्या सुरुवात केली असून यावेळी आशा वर्कर रंजना गोकुळ कोळी, जि.प.शाळेतील मुख्यध्यापक ज्योती चौधरी, विजय पाटील, रेवानंद गोशाळा अध्यक्ष गोकुळ सोनवणे, अनिल पाटील, डिगंबर सोनवणे, सुनिल पाटील, रविद्र कोळी, गणेश कोळी, मोहन कोळी, प्रकाश कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Add Comment

Protected Content