गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उद्या फैजपुरात

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे गृहनिर्माण व अल्पसंख्यांक विकास मंत्री जितेंद्र आव्हाड हे एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिनांक १ एप्रिल रोजी फैजपूर येथे येत आहेत.

 

फैजपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांच्याकडे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण व अल्पसंख्यांक विकास मंत्री जितेंद्र आव्हाड हे उद्या शुक्रवार दिनांक १ रोजी येत आहेत. दुपारी १२ वाजचा धनाजीनाना कॉलेजच्या परिसरातील हेलीपॅडवर हेलीकॉप्टरने त्यांचे आगमन होणार आहे. यानंतर ते शाहदाल बाब दर्गा येथील कार्यक्रमासह स्थनिक कार्यक्रमांना उपस्थिती देणार आहेत. यात मिल्लतनगर येथे त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. यानंतर ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांच्याकडील कार्यक्रमाला उपस्थिती देतील. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते पुन्हा हेलीकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत.

Protected Content