जालन्यातील चोरीचा जेसीबी विकत घेणाऱ्याला संशयिताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातून चोरलेली जेसीबी विकत घेणाऱ्याला दूरदर्शन टॉवर  येथून अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोर्या रा. ऑटो नगर अशोक नगर, जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी देवराज गजेबा सोनसाळे यांच्या मालकीची ७ लाख रुपये किंमतीची जेसीबी चोरी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी उघडकीला आली होती. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान चोरीस गेलेले जेसीबी हे जळगावात विक्री झाल्याची माहिती मिळाली. जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे  पोलीस कर्मचारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, योगेश भारी पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी संशयित आरोपी नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोरया रा. ऑटो नगर, अशोक नगर जळगाव याला शहरातील दूरदर्शन टॉवर येथून गुरुवार ३१ मार्च रोजी अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या वाहनातून जेसीबी चोरून आणले ते वाहन (एमएच १८ एए ५०१) मिनी ट्रक देखील जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content