ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली : एक गंभीर जखमी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकाच्या समोर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघाताच चाळीसगाव येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, मुक्ताईनगरमार्गे चाळीसगावकडे जाणार्‍या ट्रॅक्टरलची ट्रॉली येथील बस स्थानकाच्या समोर असलेल्या दुभाजकावर आदळून उलटली. यामुळे ट्रॅक्टरवर स्वार असलेले रवींद्र मच्छींद्र चव्हाण (रा. चाळीसगाव ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे बंधू ट्रॅक्टर चालवत असून त्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्रकारांनी यातील गंभीर जखमी झालेल्या रवींद्र चव्हाण यांना तातडीने मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Protected Content