Home Cities यावल संचारबंदी : लालमाती आश्रमशाळेतील विद्यार्थी करताहेत स्टडी फ्रॉम होम

संचारबंदी : लालमाती आश्रमशाळेतील विद्यार्थी करताहेत स्टडी फ्रॉम होम

0
45

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील लालमाती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे शिक्षक व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून गृहपाठ करून घेत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आले आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती ता. रावेर येथील शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व पालक यांचे वर्गनिहाय नऊ व्हाट्सएप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना त्यामार्फत दररोज गृहपाठ दिला जात आहे. यात त्यांना शुद्धलेखन, गणितीय सूत्रे, गाणी, गोष्टी, आकृत्या काढणे, स्पेलिंग या सारखा अभ्यास देण्यात आला. विविध शिक्षकांच्या शिकवणीचे व्हिडीओ व अभ्यासक्रमांच्या लिंक्स विद्यार्थ्यांना पाठविल्या जात आहेत. कोरोना या विषाणूजन्य संसर्गापासून कसा बचाव करावा या विषयीची माहिती तसेच आरोग्यविषयक बाबी इत्यादीचे लेख पालकांना पाठविले जात आहेत. सोबतच सिकलसेल सकारात्मक विद्यार्थ्यांची सुद्धा आरोग्यविषयक चौकशी करण्यात येत आहे. काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते इतर पालकांची मदत घेऊन या उपक्रमात सहभागी होत आहेत. आदिवासी विभागाच्या “शाळा बंद पण शिक्षण नाही” या उपक्रमाला प्रतिसाद देत शिक्षक विद्यार्थांना अभ्यासाचा आनंद स्टडी फ्रॉम होम च्या माध्यमातून मिळवून देत आहेत. तसेच लालमाती येथील विद्यार्थ्यांची अटल आरोग्य वाहिनी (ऍम्ब्युलन्स) च्या माध्यमातून घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करून आरोग्य सेवा सुदधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा उपक्रम एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल येथील प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात येत आहे.


Protected Content

Play sound