हिंगोणा अपघात : आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप

रावेर, प्रतिनिधी । हिंगोणा गावाजवळ फेब्रुवारी महिन्यात क्रुझर जीप व डंपर यांच्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना व जखमींना आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतिचा धनादेशाचे वाटप करण्यात आले.

रावेर तालुक्यातील मौजे निंबोल येथील रहिवाशी असलेल्या सुमनबाई श्रीराम पाटील व संगिता मुकेश पाटील हे हिंगोणा गावाजवळ २ फेब्रुवारी रोजी क्रुझर जीप व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात ठार झालेत. तसेच आदिती मुकेश पाटील व शंतनु मुकेश पाटील हे गंभीर जखमी झाले होते. मृतांचे वारस व जखमी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची अशी एकूण ३ लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. धनादेशाचे वाटप आ. चंदक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे, आदी उपस्थित होते.

Protected Content