यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून जागतिक आदीवासी दिन विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात येणार आहे.
यावल येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिन हे अस्मिता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. सालाबाद प्रमाणे यावर्षी ही आदीवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातून आदीवासी बांधवांचे जिवन राहणीमान व संस्कृतीचे दर्शन घडविणारी आदीवासी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची पारंपारीक वेशभुषा परिधान करून शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा समारोप यावल येथील धनश्री चित्र मंदीर व लॉन्सच्या या सभागृहात होईल.
याच सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षातील सन्मानिय लोकप्रतिनिधी यांच्यासह यावल, रावेर, चोपडा व जिल्ह्यातील ठिकाणच्या विविध आदीवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त, आदीवासी समाजसेवक, आदीवासी बंधु भगीनी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती राहावे, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.