लाडली येथे संस्कृती संपदा शिबिराचे आयोजन

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लाडली येथे गुरुवार २१ ते शनिवार ३० एप्रिल दरम्यान आचार्य निधि माउलींच्या संकल्पनेतून संस्कृति संपदा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताची विशेषता संस्कृतिमुळे आहे आणि जगासमोर संस्कृति च भारताची खरी प्रतिमा आहे. संस्कृति आहे तर भारत आहे आणि भारत आहे तर च जगाच आस्तित्व आहे. जगाला जी देण आहे ती सर्व भारतीय संस्कृतिची आहे. त्या संस्कृतिचा परिचय नविन पिढीला व्हावा म्हणून आचार्य निधि माउलींच्या संकल्पनेतून संस्कृति संपदा शिबिराचे आयोजन लाड़ली येथे करण्यात आले आहे. या शिबिरात महाराष्ट्रभरातील २५०-३०० मुलांचा उत्फुर्त सहभाग नोंदविण्यात आला आहे. त्या ठिकाणी योग, प्राचीन व्यायाम पद्धती, संस्कृतभाषा, संत वाड्ःमय , वैदिक तत्वांचा बोध , संगीत, संगीत , स्वावलंबीपणा अशा अनेक विषयांचे निधी वाटिकेत विनामूल्य आवास व भोजन व्यवस्था सह प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी लाडली ग्रामस्थांचे उत्कृष्ट सहकार्य लाभत आहे.

Protected Content