Home क्राईम विषारी औषध घेतलेल्या वृध्दाचा मृत्यू

विषारी औषध घेतलेल्या वृध्दाचा मृत्यू

0
112
death


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंजनविहीरे  येथे विषारी औषध सेवन केल्याने वयवृद्धाचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगन्नाथ किशन चव्हाण (वय-६९) रा. अंजन्विहिरे ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बुधवार २७ एप्रिल रोजी ते मुलगा नामदेव यांच्यासह शेतात गेले होते. शेतात काम करत असताना त्यांनी अचानक दुपारी पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्यांना अस्ताव्यस्त वाटत असल्याने त्यांचा मुलगा नामदेव चव्हाण याने तातडीने खाजगी वाहनाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोतीपराग पवार करीत आहे.

 

 

 


Protected Content

Play sound