मुक्ताईनगर येथे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात होणाऱ्या निवडणूकांसंदर्भात मार्गदर्शन केले.

 

या बैठकीत सभासद नोंदणीचा आढावा, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुक आढावा, जिल्हा परिषद गट-गण प्रमुख नेमणूक करणे, बूथ रचना, राष्ट्रवादी  युवक युवती काँग्रेस संघटनात्मक आढावा या सह इतर संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्यात आला.

 

मेहनतीमुळे पक्ष वाढतो आणि निवडणूकीत यश मिळते-आ. एकनाथराव खडसे

पक्षात संघटन हे सर्व श्रेष्ठ असते, सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीने पक्ष वाढतो निवडणुकीत यश मिळते, यासाठी पक्ष संघटना मजबुत करा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्या, त्या पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करा, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन जे नविन सरकार अस्तित्वात आले आहे ते दोन लोकांचे स्थगिती सरकार आहे.जनहिताच्या अनेक निर्णयांना या नविन सरकारने स्थगिती दिली . राज्यातअनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती असून सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठका घेण्यात व्यस्त आहे जनतेच्या समस्यांशी सरकारला देणे घेणे नाही. आपण विरोधी पक्षात असलो तरी जनतेत जाऊन समस्या जाणून घ्या त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.

 

राष्ट्रवादी पक्ष सर्वधर्मसमभाव जपणारा- रोहिणी खडसे-खेवलकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मभाव जपणारा पक्ष असून जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापासून राऊत झिरा ता. बोदवड येथुन राष्ट्रवादी सुसंवाद यात्रेला सुरुवात करणार असून २६ नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर येथे यात्रेचा समारोप होईल. या यात्रेच्या  मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार असुन गावातील ज्येष्ठ सदस्य बंधू भगिनी ,युवा व युवती कार्यकर्ते ,शेतकरी ,कष्टकरी ,महिला ,दलित -आदिवासी सर्व घटकातील बांधवांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाईल. त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून संबंधित समस्या प्रशासनाच्या विभागा कडे सोडवण्यासाठी पाठविल्या जातील…त्याचा पाठपुरावा समिती पक्षा मार्फत केला जाईल. असे सांगितले.

 

 संघटना अजून संघटीत करा- जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील

येत्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत त्याला आपल्याला सक्षमपणे सामोरे जायचे, त्यासाठी संघटना आणखी मजबूत करायची आहे, त्यासाठी बूथ रचना मजबुत करा सभासद नोंदणी करा, जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, आगामी काळात पक्षाला सर्व निवडणुकीत भरघोस यश मिळण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

यांची होती उपस्थिती

या बैठकीला रोहिणी खडसे-खेवलकर, विनोद तराळ, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, रमेश पाटील, प्रा डॉ सुनील नेवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु डी पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक तालुकाध्यक्ष राजेश ढोले, सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, शहराध्यक्ष राजुभाऊ माळी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, विकास पाटील, प्रदिप साळुंखे, किशोर गायकवाड, किशोर चौधरी, जि.प. सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील,मधुकर राणे,कैलास चौधरी, रामभाऊ पाटील, जगदीश बढे,निलेश पाटील,सतिष पाटील,बी सी महाजन,गणेश पाटील,सुनील कोंडे,भरत अप्पा पाटील,रवींद्र दांडगे,सुनील काटे,हकीम शेख,गोपाळ गगतिरे,अनिल वराडे, अनिल पाटील, निलेश पाटील, सुधीर तराळ,बाळा भाल शंकर ,सतिष पाटील ,प्रदीप बडगुजर,शेख जफर,हकीम बागवान] लता सावकारे, निताताई पाटील, प्राजक्ता चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content