Home धर्म-समाज यावल येथे जागतिक आदीवासी दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावल येथे जागतिक आदीवासी दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून जागतिक आदीवासी दिन विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात येणार आहे.

 

यावल येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिन हे अस्मिता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. सालाबाद प्रमाणे यावर्षी ही आदीवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातून आदीवासी बांधवांचे जिवन राहणीमान व संस्कृतीचे दर्शन घडविणारी आदीवासी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची पारंपारीक वेशभुषा परिधान करून शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा समारोप  यावल येथील धनश्री चित्र मंदीर व लॉन्सच्या या सभागृहात होईल.

 

याच सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षातील सन्मानिय लोकप्रतिनिधी यांच्यासह यावल, रावेर, चोपडा व जिल्ह्यातील ठिकाणच्या विविध आदीवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त, आदीवासी समाजसेवक, आदीवासी बंधु भगीनी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती राहावे, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound