धरणगाव येथील रेल्वे गाड्यांच्या प्रश्नांबाबत खा. उन्मेश पाटलांना निवेदन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुरत-भुसावळ पॅसेंजरच्या वेळेत बदल करावा आणि ताप्तीगंगा एक्सप्रेसला धरणगावात थांबा मिळावा या मागणीसाठी खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 

सुरत-भुसावळ रेल्वे गाडीच्या वेळेत काही महिन्यांपासून बदल करण्यात आले आहे. दरम्यान, वेळेत बदल केल्यामुळे अनेक कामागार, नोकरदार आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे पुर्वीच्या वेळेनुसार सुरत-भुसावळ रेल्वे पॅसेंजर सुरू करण्यात यावी. तसेच ताप्ती गंगा एक्स्प्रेला धरणगावात थांबा मिळावा या दोन प्रमख मागण्या करण्यात आले आहे.

 

यासाठी खा. उन्मेष पाटील यांच्याकडे प्रतिक जैन व धरणगाव रेल्वे सल्लागार समितीचे आनंद बाजपेयी, अँड. संदीप सुतारे, सुनिल चौधरी, घनश्याम पाटील, अनिल महाजन, हिमालय शिकरवार, योगेश ठाकरे, किरण वाणी, समाधान पाटील, किशोर झंवर सर्व पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी साकारात्मक आश्वासन देण्यात आले.

 

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जेष्ठ नेते सुभाष पाटील, शिरिष बयास, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखर पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक अॅड. राजेंद्र येवले, सुनिल वाणी, नगरसेवक ललित येवले, कडु बयास, भालचंद्र माळी, सुनील चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, मधुकर पाटील, सचिन पाटील, हितेश पटेल, आंनद वाजपेयी, युवा मोर्चाचे निलेश महाजन, विकी महाजन, व सर्व भारतीय जनता पार्टीचे  पदाधिकारी उपस्थित होते

Protected Content