पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । उच्च न्यायालय, विधी सेवा उप समिती, औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकिल संघ, पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आज पाचोरा तालुक्यातील वेरूळी खु” येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतमध्ये नियमीत दिवाणी दावे, नियमीत दरखास्त, संक्षीप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने ३६ केसेस निकाली काढण्यात येवून ४ लाख ८० हजार ८५० रुपयांची वसुली झाली. यावेळी पॅनल प्रमुख जी. बी. औंधकर, एल. व्ही. श्रीखंडे तसेच पंच न्यायाधीश म्हणुन अॅड. रविंद्र पाटील व अॅड प्रशांत नागणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन जि. प. शाळा, वेरुळी येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.बी.औंधकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश एल.व्ही.श्रीखंडे, वकील मंचाचे अध्यक्ष अॅड.प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड.चंदनसिंग राजपुत, सचिव अॅड.राजेंद्र पाटील, विस्तार अधिकारी डी.बी.सुरवाडे, विस्तार अधिकारी आर.एस.धस, सरपंच सिमा पाटील हे मंचावर उपस्थित होते. योवेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.प्रविण पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये लोक न्यायालयाचे महत्व स्पष्ट केले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या शिबीरात अॅड.अनिल पाटील यांनी महसुल विषयक कायदा या विषयांवर विस्तृत विचार मांडले.
तसेच अॅड.एस.पी.पाटील यांनी बालकांचे अधिकार व सक्तीचे मोफत शिक्षण यावर गावक-यांना मार्गदर्शन केले. तसेच सह न्यायाधीश एल.व्ही.श्रीखंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार यात महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार, महिलांचे त्याबाबत अधिकार व हक्क यावर मार्गदर्शन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय मनोगतात दिवाणी न्यायाधीश जी.बी.औंधकर यांनी लोक न्यायालयाचे फायदे स्पष्ट केले. आपला वेळ, पैसा, नाती हे कसे जिवंत राहतात हे सांगुन पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की,”दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी होणा-या लोकन्यायालयात वादातीत व वादपूर्व प्रकरणे तडजोडीने सोडविणे करिता जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोकन्यायालय या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
यावेळी अॅड.एस.बी.माहेश्वरी, अॅड.ए.डब्ल्यु.देशमुख, अॅड.एम.के.मोरे, अॅड.व्ही.ए.पाटील, अॅड.सुनिल पाटील, अॅड.स्वप्नील पाटील, अॅड.संदीप पाटील, अॅड.दिपक पाटील, अॅड.करुणाकर ब्राह्मणे, अॅड.राजेंद्र परदेशी, अॅड.आर.आर.राजपुत, अॅड.अरुण भोई, अॅड.निलेश सुर्यवंशी, अॅड.पी.बी.पाटील, अॅड.रणसिंग राजपुत, अॅड.अनुराग काटकर, अॅड.अंकुश कटारे, अॅड.शांतीलाल सौंदाणे, अॅड.डी.आर.पाटील, अॅड.संजीव तैनाव, अॅड. बोरसे, अॅड.देवगमा, अॅड.मनिषा पाटील, अॅड.भाग्यश्री महाजन, अॅड.कविता रायसाकडा, अॅड.मीना सोनवणे, अॅड.भिकुबाई पाटील, अॅड.एन.एस.महाजन, अॅड. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्रामसेवक शरद पाटील, राजेंद्र पाटील, न्यायालयीन कर्मचारी जी.आर.पवार, सहा. अधिक्षक अमित दायमा, दिपक बाविस्कर, दिपक तायडे, अनिल गोधने, विजय पवार, सचिन राजपुत, ईश्वर पाटील, सर्व वकिल संघ सदस्य यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अॅड.चंदन राजपुत यांनी तर आभार मुख्याध्यापक महाजन यांनी मानले.