यावल प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र शासनाने इंधन दरवाढीसह सर्व जिवनावश्यक वस्तूंच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या किमतीमुळे देशाचा सर्वसामान्य नागरीक हा महागाईमुळे मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. यांच्या निषेधार्थ आज यावल येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या निषेधार्थ शहरातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलेत .
आज सकाळी १० वाजता यावल चोपडा मार्गावरील डी.के. पेट्रॉलीयमच्या पेट्रोल पंपावर यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा काँग्रेस कमेटीचे प्रदेश उपाध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणी यावल तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कॉंग्रेस गटनेते शेखर पाटील, जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पं.स.चे माजी सभापती लिलाधर चौधरी, काँग्रेस कमेटीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे, माजी पं.स.सदस्य प्रशांत पाटील, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, यावल तालुका शेतकी संघाचे संचालक अमोल भिरूड, यावल नगरपरिषदचे नगरसेवक गुलाम रसुल हाजी गु. दस्तगीर, काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष हाजी गफ्फारशाह, वढोदे गाव सरपंच संदीप सोनवणे, अनुसुचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला इंगळे, युवक काँग्रेसचे नईम शेख, युवा कार्यकर्ते राजेश करांडे , अशपाक शाह,आदी कार्यकर्त व पदधिकारी यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले.