यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने चना ( हरभरा ) हंगाम २०२२-२०२३ खरेदी केंद्र यावल येथे शूभारंभ अतिश्घ साध्या पद्धतीने शेतकरी बांधवाच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य गोदाम या ठिकाणी २० मार्च रोजी सकाळी १० वाजता सुयवात करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नाना यादव महाजन रा.कोरपावली तालुका यावल यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन करुन सपन्न झाला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे माजी उपसभापती तथा कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे ,बाजार समीती सचिव स्वपनील सोनवणे, वि.का.सोसायटीचे संचालक ललीत महाजन, महेंद्र नेहेते, मिलिंद महाजन, इम्रान पटेल, सर्व संचालक मंडळ तसेच सोसायटीचे सचीव मुकुंदा तायडे व कोरपावली ग्राम पंचायत सदस्य अफरोज पटेल व परिसरातील शेतकरी बांधव याप्रसंगी मोठया संख्येत उपस्थित होते.
यावेळी शासना कडून किमान आधारभुत किमती खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढ मिळाल्यानंतर आजपर्यंत तालुक्यातुन एकूण ७७५ शेतकऱ्यांनी आपल्या नांवाची नोंदणी केल्याची माहीती यावेळी कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली व तालुक्यातील जास्त जास्त शेतकऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत आपल्या हरभरा विक्रीची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.