यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट रोडवर अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर यावल पोलीस कारवाई केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील भुसावळ-टी पॉईंट परिसरात सार्वजनिक ठिकाणी अवैधपाणे गुटखा विक्रीसाठी सायकलवरून वाहतूक करणाऱ्या एका वृध्दावर यावल पोलीसांनी कारवाई केली आहे. प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले वय ६५ रा. बारीवाडा यावल यांच्यावर ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल मोहन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे करीत आहे.