नायगावात किशोरवयीन मुलाची आत्महत्या

 

यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथे एका अल्पवयीन मुलांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना काल  घडली

 

यावल पोलीसात याबाबत अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सुजल रमण तडवी ( वय १६ वर्ष , रा – नायगाव ) या अल्पवयीन मुलाने  काल  दुपारी गुरांच्या गोठयात पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली . या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी ( वय ४३ वर्ष ) यांनी दिल्याने पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली  पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . सुजलने आत्महत्याका केली हे लगेच समजू शकले नाही रागाच्या भरात त्यांने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे .

 

Protected Content