यावल येथील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोनलास मिळाला प्रतिसाद!

यावल, प्रतिनिधी| विविध प्रलंबीत मागण्यासाठी एस. टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आज  राज्यव्यापी संप पुकारण्यात आले आहे. या संपला यावल आगारातील कर्मचाऱ्यांनी येथून सहभाग नोदवून पहिल्याच दिवसी आंदोलन यशस्वी केले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावे म्हणून राज्य परिवहन महामंडळच्या एस.टी. कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन आज पुकारले आहे. या आंदोलनला यावल आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी येतुनच सहभाग नोद्वाला. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या २७ विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात आगातील सुमारे ३७५ चालक, वाहक व ईतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला. या संपामुळे आगारातील ७० बसेस पुर्णपणे बंद होती. यामुळे  वाहतुक ठप्प झाली. एकुण ७५ शेडुअल रद्द झाल्याने एका दिवसाला मिळणारे सुमारे ५ लाख ते ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न महामंडळाचे नुकसान झाले . दरम्यान या एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावास जाणारे किंवा बाहेरगावाहुन येणाऱ्या प्रवासी तसेच ग्रामीण क्षेत्रातुन शैक्षणिक कार्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांंची या मुळे मोठया प्रमाणा गैरसोय झाली. मात्र या संधीचा फायदा अवैद्य प्रवासी वाहतुक करणाऱ्यांची या संपामुळे चांदी झाली झाल्याचे दिसुन येत होते . या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपात यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक आणी इतर चार अधिकाराऱ्यांनी यात सहभाग झाले नसल्याचे एसटी महामंडळाच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले.

Protected Content