Home Uncategorized अमळनेरात आमदार अनिल पाटील यांचा विजय

अमळनेरात आमदार अनिल पाटील यांचा विजय

0
118

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अमळनेर सोसायटी मतदारसंघातून आमदार अनिल पाटील यांनी विजय संपादीत केला असून या माध्यमातून सहकार पॅनलला अजून एका जागेवर यश लाभले आहे.

जिल्हा दुघ संघाच्या निवडणुकीत अमळनेर सोसायटी मतदारसंघातून आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मीताताई वाघ यांच्यात लढत होती. आधीच्या कार्यकारिणीत स्व. उदय वाघ हे निवडून आले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची कन्या भैरवीताई पलांडे यांना संचालक म्हणून संधी मिळाली होती. दरम्यान, यंदा आजी-माजी आमदार यांच्यात जोरदार लढत झाली.

या लढतीमध्ये आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विजय मिळविला आहे. त्यांना २४६ मते मिळाली असून स्मिाताई वाघ यांना १८४ मते मिळाली. यातून त्यांचा विजय निश्‍चीत झाला आहे. यामुळे पराग मोरे आणि छायाताई देवकर यांच्या पाठोपाठ सहकार पॅनलला तिसरी जागा मिळाली आहे.


Protected Content

Play sound