यावल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवेबाबत आमदारांच्या जनता दरबारात तक्रारी

yawal gramin hospital

यावल, प्रतिनिधी | येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक ती औषधी आणि इतर सामुग्री मिळत नसल्याने रुग्णांचे उपचार हे रामभरोसे सुरू असुन, रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी नागरिकांनी थेट आमदारांच्या जनता दरबारमध्ये प्रश्न उपस्थित केल्याने ग्रामीण रुग्णालयाची रूग्णसेवाही रामभरोसे सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 

या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील जनतेशी संपर्क साधुन त्यांच्या समस्या व अडीअडचणी समजुन घ्याव्यात आणि त्या मार्गी लावाव्यात, या दृष्टीकोणातुन रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी दोन दिवसांपुर्वी यावलच्या तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात केले होते. या जनता दरबारात आ. चौधरी यांच्यासमोर नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णसेवेच्या नांवाखाली सुरू असलेल्या भोंगळ कारभारा विषयी अनेक तक्रारी केल्या. यात प्रामुख्याने रूग्णालयात गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात. यात रक्त न मिळणे, प्रसुतीसाठी लागणारी आवश्यकती सेवा देण्यात असमर्थता, अशा विविध समस्या सध्या रुग्णालयात निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. यात अधिक भर म्हणजे रुग्णांशी पारिचारिकांचे वागणे बेशिस्त व बेजबादारीचे आहे. या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन आ. चौधरी यांनी यावेळी दिले.

Protected Content