उद्या शुक्राम अण्णा यांच्या कृतज्ञता सोहळ्या निमित्ताने कीर्तन

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव खुर्द येथील रहीवाशी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी व किनगाव खुर्दचे माजी सरपंच शुक्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्राम अण्णा यांच्या कृतज्ञता सोहळ्या निमित्ताने उद्या मंगळवार दि. ४ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

किनगाव खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वेळा विजयी होवुन प्रर्दीघकाळ माजी सरपंच म्हणुन राहीलेले शुक्राम व्यंकट पाटील वय ८३ वर्ष यांचे रविवार दि.२६ रोजी रात्री १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आण्णांनी आपल्या राजकीय प्रवासात विविध पदे साभांळली त्यामुळे त्यांचा जनसंपर्कही मोठा होता शुक्राम आण्णांचा कृतज्ञता सोहळा निमीत्त किनगाव खुर्द ग्राम पंचायत चौकात आज रात्री ८:३० वाजता ह.भ.प.प्रविण महाराज दुशिंग पाटील. औरंगाबाद(वैजापूर)यांच्या किर्तनाच्या कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परीसरातील सर्व भाविकांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किनगाव खुर्दचे सरपंच भुषण नंदन पाटील आणी आयोजकांनी केले आहे.

Protected Content