यावल महाविद्यालयातर्फे दर्शना पाटीलचा सत्कार

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नागपूर (विर्दभ) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठव्दारे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात दर्शना पाटील हिने यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल यावल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावलच्या राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थीनी दर्शना भिकन पाटील हिने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात व्दारे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात आपला यशस्वी सहभाग नोंदविल्या बद्दल यावल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते दर्शना पाटील हिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, प्रा.संजय पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार, डॉ. सुधा खराटे, डॉ. एस.पी. कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा, मिलिंद बोरघडे आदींनी कु.दर्शना पाटील चे या राष्ट्रीय एकात्कमता शिबीरात सहभागाचे कौतुक करून अभिनंदन केले.

Protected Content