राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  जळगाव जिल्हा महानगरतर्फे आकाशवाणी चौक येथे महामार्गावर रस्ता अडवून राज्यपालां विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्रीय नागरिकांचा अपमान करणारे वक्तव्य केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव यांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा महानगरतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासह महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी  राष्ट्रवादी  कॉंग्रेस पार्टीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की,   राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मन दुखावले आहे व महाराष्ट्राचा व महाराष्ट्रीयन नागरिकांचा अपमान झालेला आहे. यापूर्वी देखील कोशारिंनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी व ईतरही बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली होती.  राज्यपाल या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सातत्याने  असे  वादग्रस्त समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे अत्यंत निंदनीय व खेदजनक असल्याचे स्पष्ट केले. 

 

याप्रसंगी महानगराध्यक्ष  अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, रिकू चौधरी, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, अशोक सोनवणे, उज्वल पाटीलभगवान सोनवणे, रमेश बहारे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, विशाल देशमुख, इब्राहिम तडवी, किरण राजपूत, अनिल पवार, संजय जाधव, राहुल टोके, किरण चव्हाण, सूर्यकांत भामरे, हितेश जावळे, भला तडवी, भिमराव सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content