दहीहंडी निमित्त शासकीय सुट्टी : परिपत्रक जारी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दहीहंडीच्या निमित्ताने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करण्यात आली असून आज याचे परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनीक सुट्टी हवी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला होकार देखील दिला होता. याचेच परिपत्रक आज जारी करण्यात आले आहेया परिपत्रकानुसार येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी असेल.

दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना लवकर परवाने मिळावेत म्हणून राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरु केली आहे. मंडप तसेच इतर परवानग्या लवकर मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोठेही क्लिष्ट अटी नकोत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.