यावल, प्रतिनिधी | यावल नगरपालिकेच्या अखेरची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडली. यावेळी ४८ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४६ विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावल नगरपालिकेची अखेरची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू विश्वनाथ चौधरी (हेन्द्री ) यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात आज पार पडली. सभेच्या पटलावर ४८ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन विषय नामंजूर करण्यात आले. तर ४६ विषयांना मंजूर देण्यात आली आहेत. नगरपालिकेचा पाच वर्षाचा कालावधी येत्या दोन दिवसात संपुष्टात येणार आहे. त्याअनुषंगाने अखेरची सभा घेण्यात आली. विषय क्रमांक येथील नगरपरिषदेच्या वतीने दुर्बल घटकांसाठी असलेल्या तरतुदीतून गरजू विद्यार्थी व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे, याविषयासह विषय क्रमांक १६ स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावल नगरपालिकेचा देशांमध्ये चौथा क्रमांक आला आहे. यामुळे यावल शहरात डिजिटल बॅनर लावणे बाबत दरास कार्योत्तर, मंजुरी अशा दोन विषयावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आक्षेप घेतले. पालिकेने काढलेल्या निविदांना केवळ तीन दिवसाचा अवधी दिला. निविदांना किमान सात दिवसाचा अवधी असावयास पाहिजे दोन्ही विषय आपतकालीन अथवा तातडीचे नव्हते. त्यामुळे दोन्ही निविदा बेकायदेशीर असल्याचे सभागृहात सांगीतले प्रशासनाच्या वतीने या विषयावर दिलगीरी व्यक्त केली. मात्र सर्व सभासदांनी दोन्ही विषय एकमताने नामंजूर केले.
चर्चेत नगरसेवक अतुल पाटील, प्रा, मुकेश येवले, शे. असलम शे. नबी, यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर सभेत नगरसेवक प्रा . मुकेश येवले , राकेश कोलते , समिर शेख मोमीन , पौर्णीमा फालक , देवयानी महाजन, नगरसेवक मनोहर सोनवणे, कल्पना वाणी , रेखा चौधरी आदी नगरसेवक उपस्थित होते.