यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साक्षरतेकडून समृद्धी या संकल्पनेतुन केन्द्र शासनाने निरक्षरांसाठी साक्षरता अभियानाला यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक येथून सुरूवात करण्यात आली. नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमा अंतर्गत निरक्षर सर्वेक्षण मोहीमचा कार्यक्रमाबाबत तालुका गट शिक्षणधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे.
यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक गावातील श्री दत्त हायस्कुल मधील शिक्षकांच्या सर्वेक्षणासाठी उपस्थितीत आणि गावाचे प्रथम नागरीक संरपच जाणकीराम मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून शाळेतील मुख्याध्यापक किशोरकुमार उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली निरक्षर बालकांचे व त्यांच्या कुटुंबातील लोकांचे सर्वेक्षणाचे अभियान सुरू करण्यात आले आहे. श्री दत्त हायस्कुल चिखली बु च्या शिक्षकांनी गट करून प्रत्येक कुटुंबातील माहिती नोंदवणे घरातील सदस्य संख्या स्त्री पुरुष १५ ते ३५ या वयोगटातील व ३५ ते ६० या वयोगटातील स्त्री पुरुष आणि साक्षर व निरक्षर अशी माहिती नोंदवली जात आहे निरक्षरांना पायाभुत साक्षरता, संख्याज्ञान, जिवन कौशल्य विकसीत करण्यासाठी शिक्षक,विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्थांना या अभियांनासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आहे.
चिखली बु॥ येथे सुरू करण्यात आलेल्या या मोहीमेसाठी गट प्रमुख सौ प्रतिभा नारखेडे, सौ पुष्पा चौधरी, किरण झांबरे,शैलेंद्र लोहार,दामोदर नेवे, मनोहर ठाकूर हे प्रत्यक्ष सर्वेक्षण करित असुन ३१ऑगस्ट पर्यंत ही मोहीम चालणार आहे असल्याची माहीती पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली .