Home Cities यावल फैजपूर सोसायटी निवडणूक – शेतकरी पॅनलचे ११ तर २ अपक्ष विजयी

फैजपूर सोसायटी निवडणूक – शेतकरी पॅनलचे ११ तर २ अपक्ष विजयी

0
31

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर वि.का सो. २०२२ ते २०२७ पंचवार्षिक निवडणूक १३ जागेसाठी लागली असून ४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ९ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी शेतकरी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले.

या निवडणूकीत अपक्ष नितीन नेमाडे व संतोष मेढे विजयी झाले आहेत्त्र रोहिदास भंगाळे, देवेंद्र बेंडाळे, शरीफा तडवी पराभूत झाले आहेत. निवडणूकीत एकूण २५१ मतदारांनी मतदान केले.

विजयी उमेदवार –

चंद्रशेखर देविदास चौधरी (200),

पांडुरंग दगडू सराफ (186),

केतन डीगंबर किरंगे, ( 189)

अप्पा भालचंद्र चौधरी,(180)

हेमराज खुशाल चौधरी,(163)

काशिनाथ डोंगर वारके,(168),

नरेंद्र पितांबर चौधरी,(158)

यांचे शेतकरी पॅनल आहेत.

अपक्ष नितीन नेमाडे (193)

अनुसूचित जाती जमाती मध्ये – संतोष मेढे (130)

ओबीसी गटातून – विलास महारु महाजन

महिला गटातून – शकुंतला मोतीराम भारंबे, अनिता अरुण चौधरी

भटक्या विमुक्त जाती गटातून – माधव भोई बिनविरोध निवडून आले.

मतदान रविवार, दि.१७ एप्रिल रोजी झाले. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एम बी गाढे यांनी निकाल घोषित केला. योगेश सूर्यवंशी, दामू पाटील, मनोज कुलकर्णी यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound