यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी टिकेना !

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात कुणीही वैद्यकीय अधिकारी टिकत नसल्यामुळे रूग्णांची पुन्हा एकदा हेळसांड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ तौसीफ खान व डॉ. आशिया तौसीफ खान हे दाम्पत्य दोन महीन्यांपुर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणुन रुजु झाले होते. त्यांच्या सोबतच डॉ. शुभम जगताप यांनी ही यावल येथे आपली रुग्णसेवा सुरू केली होती. मात्र यावल येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचाराच्या नांवाखाली नियमीत होणारे कार्यकर्त्यांचे गोंधळ व नको त्या विषयात सातत्याने होणारे हस्तक्षेप ही वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांची डोके दुखी वाढली. यातच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या राहण्यासाठी निवास स्थानाची होणार्‍या गैरसोयीची भर पडली. परिणामी दोन महिन्यातच डॉ. तौसीफ खान व त्यांच्या पत्नी डॉ आशीया खान यांनी आपले पदभार सोडले. या पाठोपाठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जगताप यांनी देखील ३१ मार्च रोजी पासुन यावल ग्रामीण रुग्णालयातुन पदभार सोडणार आहेत. यामुळे रुग्णाची वैधकीय उपचार सेवा पुर्णपणे कोलमडली आहे. तात्पुरता दिलासा म्हणून शालेय आरोग्य सेवा देणार्‍या डॉ. शबाना तडवी, जॉ कमलेश पाटील, व डॉ. अमीर तडवी हे रुग्णसेवा करीत आहे. मात्र पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे.

या आदी यावल ग्रामीण रुग्णालयास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी पुनश्‍च पाठपुरावा करावा लागणार असुन, त्या आदी वैद्यकीय अधिकारी यांच्या करीता आवश्य असलेली निवास स्थानाची व्यवस्था करणे आणी रुग्णसेवेत वाढणारे कार्यकर्त्यांचे हस्तक्षेप व होणार्‍या गोंधळास पायबंद घालणे देखील गरजे आहे, या विषयाला गांर्भायाने घेतल्यास या रुग्णसेवे ची समस्या मार्गी लागेल अन्यथा नागरीकांना व रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल हे निश्‍चित.

Add Comment

Protected Content