यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यात ३५२ शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेल्या सुमारे ५ कोटी रूपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा क्षेत्रनिहाय प्राथमिक अहवाल कृषी विभागा कड्डन महसुल प्रशासनाकडे आज सादर करण्यात आले असल्याची माहीती प्रभारी कृषी अधिकारी पी.आर. कोळी यांनी दिली आहे.
या संदर्भात २९ मे रोजी रात्रीच्या वेळीस झालेल्या वादळी वाऱ्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असुन यावल तालुका कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या मंडळ यावलच्या कार्यक्षेत्रात ३३ टक्केच्या वरील नुकसान झालेले गाव डोंगर कठोस १४ शेतकरी बाधित तर केळीचे नुकसान क्षेत्र १४.८४ हेक्टर, मंडळ किनगाव,काधीत शेतकरी ५ एकूण नुकसान झालेले केळी पिक २ , ५० हेक्टर , फैजपुर मंडळ क्षेत्रातील बोरखेडा बु॥ केळी पिकांचे नुकसान ३ हेक्टर बाधीत शेतकरी ५ , मारूळ तालुका यावल बाधीत शेतकरी ११ नुकसान झालेले क्षेत्र ६ ,०० एकुण बाधीत क्षेत्र २६, ३४ हेक्टर तर ३३ टक्केच्या आत वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या पिकांची परिस्थिती पुढील प्रमाणे यावल मंडळातील गाव परसाडे बाधीत शेतकरी २ केळी पिक३ हेक्टर ,कोळवद बाधीत शेतकरी संख्या १५, केळी पिक११ , ५ हेक्टर , विरावली बाधीत शेतकरी २० नुकसानीचे क्षेत्र १५ हेक्टर (केळी ), बोरखेडा खु॥ बाधीत शेतकरी संख्या ५, नुकसानीचे क्षेत्र ४ .१हेक्टर ( केळी ) , महेलखेडी बाधीत शेतकरी संख्या १७ नुकसानीचे क्षेत्र १५ हेक्टर (केळी ) , कोरपावली बाधित शेतकरी ७५तर नुकसानीचे क्षेत्र ६५ हेक्टर (केळी ) , यावल बाधीत शेतकरी संख्या ३२तर नुकसानीचे क्षेत्र २० हेक्टर ( केळी ) , मोहराळा बाधीत शेतकरी ९५तर तुकसानीचे क्षेत्र ९६ हेक्टर ( केळी ) , हरिपुरा बाधीत शेतकरी २तर नुकसान ३ हेक्टर ( केळी ) , डोंगर कठोरा बाधीत शेतकरी १४तर नुकसानीचे क्षेत्र १४ .८४ हेक्टर ( केळी ) , वड्री बाधीत शेतकरी संख्या १० नुकसान ८ .६ हेक्टर (केळी ), किनगाव मंडळ कासारखेडा बाधीत शेतकरी ५तर नुकसान २ .५० हेक्टर ( केळी ) , आडगाव बाधीत शेतकरी ४ नुकसान २हेक्टर (केळी ) , फैजपुर मंडळ क्षेत्रीतील बोरखेडा बु॥ बाधीत शेतकरी ५तर नुकसान ३ हेक्टर ( केळी ) , मारूळ बाधीत शेतकरी ११ नुकसान क्षेत्र ६ हेक्टर (केळी ), न्हावी बाधीत शेतकरी ५ नुकसान ५.६ हेक्टर ( केळी ) असे असुन ३३ टक्केच्या आतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३२७ असुन , ३३ टक्के वर बाधीत शेतकरी संख्या ३५ असल्याची माहिती यावल तालुका प्रभारी कृषी अधिकारी पि आर कोळी यांनी दिली असुन यात पाच कोटी रुपयांच्या केळी पिकांचे नुकसान झाले असुन या नुकसानी संदर्भातील कृषी विभागाने केलेला प्राथमिक पाहणी अहवाल महसुल प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे .