यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिद्धार्थनगर व पंचाशिल नगर तरुण युवकांच्या मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती आठवडे बाजार परिसरातुन रावेर यावल विधान सभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन व पुजनानंतर मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

यावल येथे शुक्रवारी १४ एप्रिल रोजी यावल शहरातील आठवडे बाजार परिसरातील पंचशीलनगर व सिध्दार्थनगर या ठीकाणाहून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंतीची मिरवणुक रावेर यावलचे आ. शिरीष चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी नगरसेवक गुलाम रसुल, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, अक्षय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे ,माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, कदीर खान, अनिल जंजाळे, युवराज सोनवणे, सागर गजरे, अशोक बोरकर, भिमराव वाघ, विक्की गजरे, नईम शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आकर्षक बग्गीवरून काढण्यात आलेल्या डॉ बाबा साहेबाच्या आंबेडकरांची प्रतिमा मिरवणुकीत सहभाग घेतला.

शहरातील बुरुज चौक, खिर्निपुरा नगिना मस्जिद, जुने भाजी बाजार बारीवाडा चौक, काजीपुरा मस्जीद, बोरावल गेट आंबेडकर नगर अशा मार्गाने मिरवणुक काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सांगता पुनश्च पंचशील नगर सिद्धार्थनगर आठवडे बाजार परिसरात झाली, यावेळी मिरवणुकीत संगीताच्या सुमधुर तालावर तरूणाई बेधुंद होवुन नाचत होती. यावेळी फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, वरीष्ठ सहाय्यक फौजदार अजिज शेख, सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार असलम खान, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला .

Protected Content