Dream 11 यांना आयपीएलचे २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व

नवी दिल्ली वृत्तसंस्था । IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची माळ Dream 11 यांच्या गळ्यात पडली आहे, त्यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे.

Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

IPL आणि चिनी कंपनी विवो हे ५ वर्षांसाठी करारबद्ध आहेत. २०१८ ते २०२२ असा टायटल स्पॉन्सरशीपचा कालावधी होता. पण भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. यानंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं. ज्यानंतर जनभावनेचा आदर करत ‘बीसीसीआय’ने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.

तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना ‘बीसीसीआय’ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती.

स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे ‘बीसीसीआय’ने याआधीच स्पष्ट केलं होतं.

हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केलं होतं.

 

Dream 11 is the main sponsor of IPL for Rs 222 crore, Tata Sons, Byju’s, Unacademy, Dream 11 IPL 2020, VIVO,

Protected Content