Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

0
38


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते.

यानिमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, तहसिलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, पंकज लोखंडे, प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार सुनील समदाणे, अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound