यावल, प्रतिनिधी । जळगाव येथे भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व माजी उर्जामंत्री बावनकुळे यांची यावल नगरसेवक तथा भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे व कार्यकर्त्यांनी भेट घेवून संघटनात्मक चर्चा केली.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत जळगाव येथे माजी ऊर्जा मंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनिकेत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चासह युवा वॉरिअर्स व हेल्थ वॉरिअर्सची बैठक नुकतीच झाली. यावेळी पक्षातील संघटनात्मक विषयांवर महत्वाची चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आपली कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. यावल नगर परिषदचे नगरसेवक तथा भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे डॉ. कुंदन सुधाकर फेगडे, भाजयुवा मोर्चाचे यावल तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, योगेश खेवलकर, रितेश बारी , लीलाधर काटे, कृणाल कोल्हे, सागर लोहार यांच्यासह आदी तालुक्यातील पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत सत्कार केले .